राजश्री पाटील-तेरणी यांनी कोरेगांव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
संभाजी पुरीगोसावी
सातारा : खरा पंचनामा
सातारा जिल्हा पोलीस विभागातील कोरेगांव तालुक्यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांची पदोन्नतीने नागपूर येथे मागील काही दिवसांपूर्वी नियुक्ती झाली आहे. आता कोरेगांवला डीवायएसपी म्हणून पुन्हा एकदा महिला अधिकारी लाभल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशावरून राजश्री पाटील-तेरणी यांनी कोरेगांव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्याकडूंन आज पदभार स्वीकारला.
राजश्री तेरणी-पाटील या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी गावच्या सर्वसामान्य कुटुंबातील कन्या आहेत. सातारा जिल्हा पोलीस दलात त्यांची डीवायएसपी म्हणून प्रथमच नियुक्ती असुन कोरेगांवला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्या रुजू झाल्या.
सातारा जिल्ह्यात प्रथमच नियुक्ती झाली असून. शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मला प्रथमच मिळाली असुन हे माझे मोठे भाग्य म्हणावे लागेल, मी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.