'कुठल्यातपरी दैवी शक्तीच मला मार्गदर्शन मिळत होतं'
नवी दिल्ली : खरा पंचनामा
सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाने नवीन खुलासा केला आहे. 72 वर्षाच्या राकेश किशोर यांना आपल्या कृत्याबद्दल कुठलाही पश्चाताप नाहीय. पण त्यांच्या कुटुंबाने मात्र, त्यांच्या कृत्याचा निषेध केलाय.
पोलिसांनी चौकशीनंतर राकेशला सोडून दिलं. वॉर्निंग देऊन सोडा असे CJI कडूनच अधिकाऱ्यांना निर्देश होते. राकेशने हिंदुस्तानटाइम्सशी बोलताना सांगितलं की, "तो तुरुंगात जायला तयार आहे. त्याने विशेष जोर देऊन सांगितलं की, तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीय" "मी तुरुंगात असतो, तर जास्त चांगलं झालं असतं. माझं कुटुंब माझ्या कृत्यामुळे माझ्यावर नाराज आहे. ते मला समजू शकत नाहीत" असं राकेश किशोर यांनी मयूर विहार येथील त्यांच्या घरातून बोलताना सांगितलं. राकेश किशोर यांनी अनेक तर्कसंगत नसलेले दावे केले. 'कुठल्यातपरी दैवी शक्तीच मला मार्गदर्शन मिळत होतं' असा दावा राकेश किशोर यांनी केला.
ही घटना कोर्टनंबर 1 मध्ये सुनावणी दरम्यान सकाळी 11.35 च्या सुमारास घडली. राकेश किशोर यांनी आपल्या पायातला बूट काढला मुख्य न्यायाधीशांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी वेळीच त्यांना अडवलं आणि बाहेर घेऊन गेले. न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनीसरन्यायाधीशांकडे कारवाईसाठी आदेशाची मागणी केली. त्यावर गवई यांनी या घटनेकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं. राकेश किशोर यांना वॉर्निंग देऊन सोडून द्या असं सांगितलं. राकेश किशोर यांच्याकडे अधिकृत प्रवेश कार्ड होतं असं पोलीस अधिकाऱ्यांनीसांगितलं. यात बार काउंसिल ऑफ इंडियाच कार्ड आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या (SCBA) अस्थायी सदस्यतेचा समावेश होता.
बार काउंसिलने गवईयांच्यावर बूट भिरकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाची सदस्यता निलंबित केली आहे. खजुराहो येथील भगवान विष्णुंच्या एका नुकसानग्रस्तमुर्तीशी संबंधित एक जुन्या प्रकरणात सरन्यायाधीशांनी एक टिप्पणी केली होती. त्यावरुन हा सर्व प्रकार घडला. 'त्या निर्णयानंतर मला झोप आली नाही. प्रत्येकरात्री देव मला विचारायचा इतक्या अपमानानंतर मी कसा सुखाने झोपू शकतो?" असा राकेश किशोर यांचा दावा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.