Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"मी डॅडला पत्नीसोबत बाथरूममध्ये..." माजी डीजीपीच्या मुलाचे झोप उडवणारे दोन व्हिडिओ; बहिणीबाबतही धक्कादायक खुलासा

"मी डॅडला पत्नीसोबत बाथरूममध्ये..." 
माजी डीजीपीच्या मुलाचे झोप उडवणारे दोन व्हिडिओ; बहिणीबाबतही धक्कादायक खुलासा

चंदीगड : खरा पंचनामा

पंजाबचे डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांच्या मुलगा अकील अख्तर याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अकीलच्या हत्येच्या आरोपाखाली त्याचे वडील, माजी मंत्री असलेली आई आणि बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचकुला पोलीस या घटनेचा तपास करत आहे. या घटनेच्या आधीच अकीलचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एक व्हिडीओ तर अकीलनेच सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या व्हिडीओमध्ये अकीलने धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे वडील असलेल्या डीजीपीचे काळे कारनामे उघड झाले आहेत.

अकील अख्तर हायकोर्टात वकिली करत होता. त्याने पहिल्या व्हिडीओमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. आज 27 ऑगस्ट आहे. मी हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहेत. कारण माझ्याकडे पुरावा असला पाहिजे. माझी पत्नी आणि माझ्या वडिलांचं अफेअर सुरू आहे. लग्नाच्या एक वर्षानंतर मी, 2018 मध्ये माझ्या वडिलांना आणि पत्नीला बाथरूममध्ये पकडलं होतं. मी खूप तणावात आहे. मला बेकायदेशीरपणे डिटेन केलं होतं. ज्या दिवशी या दोघांना मी रंगेहाथ पकडलं, त्याच दिवशी माझ्यावर खोटी केस दाखल करण्यात आली होती, असं अकील या व्हिडीओत म्हणतोय.

मी माझी आई आणि बहिणीचं बोलणं ऐकलं होतं. याचा बंदोबस्त केला पाहिजे, असं त्या म्हणत होत्या. म्हणजे एक तर मला तुरुंगात टाकायचं किंवा मला ठार मारायचा यांचा प्लान होता. कारण पंचकुलामध्ये यांचं काही चालत नाही. तुला काय करायचं ते कर, असं माझे घरचे मला वारंवार म्हणत आहेत, असंही अकीलने या व्हिडीओमध्ये म्हटलंय.

अकीलने त्याच्या बहिणीवरही गंभीर आरोप केले आहेत. लग्न करण्यासाठीच बहीण घरातून पळून गेली होती, असं तो म्हणतो. 2012 ची ही गोष्ट आहे. तेव्हा मी सोनीपतमध्ये लॉचं शिक्षण घेत होतो. माझी बहीण वेश्या व्यवसायाशीही संबंधित आहे. कारण तिला कोणी पैसे देत नव्हते. तिच्याकडे कोणतंही टॅलेंट नव्हतं. असं असताना तिच्याकडे पैसे कुठन येत होते?, असा सवाल त्याने केला.

अकीलने त्याच्या पत्नीवरही आरोप केलेत. हनीमूनच्या रात्री माझ्या बायकोने मला स्पर्श सुद्धा करू दिला नाही. नंतर दुसऱ्या दिवशी मला ती टॉन्ट मारत होती. तुला माझ्यासोबत अंघोळ करायची का? असा टोमणा ती मला मारत होती. माझ्या बायकोची आणि माझ्या वडिलांची आमच्या लग्नाच्या आधीपासूनच ओळख होती, असं सांगतानाच माझ्या पत्नीचा माझ्याशी नव्हे तर माझ्या वडिलांशी विवाह झाला होता, असा दावा त्याने केलाय.

माझ्या वडिलांनी माझं अपहरण केलं. मला रिहॅब सेंटरमध्ये ठेवलं. तिथे माझ्यावर कोणीच उपचार केले नाही. जर माझी मानसिक स्थिती ठिक नसती तर मला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलं असतं. जेव्हा मी रिहॅब सेंटरमध्ये सर्व हकिकत सांगितली तेव्हा मला तिथून नेण्यात आलं. मला जबरदस्तीने ओढून नेलं. मी कोणतीच नशा करत नाही. माझ्या वडिलांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केला. हरियाणात पंजाब पोलिसांची ताकद दाखवली, असं त्याने म्हटलंय.

दुसऱ्या व्हिडीओत अकील अंथरूणावर पहुडलेला दिसत आहे. तो म्हणतो, सकाळ होत आहे. सूर्याची किरणे येत आहे. मी गेल्या वर्षी एक व्हिडीओ टाकला होता. मी मेंटल इलनेसचा उपचार घेत होतो. देवाची कृपा म्हणजे माझ्या घरचे चांगले लोक आहेत.

माझ्या आईवडिलांच्या जागी दुसरे कोणी असते तर मला घरातून हाकलले असते. मला सर्व काही उलट सुलटं वाटत आहे. आता मी ठिक आहे. मी जे काही आधी सांगितलं तो केवळ मूर्खपणा होता हे आता मला कळून चुकलंय. मी माझ्या कुटुंबाची माफी मागू इच्छितो. माझ्या बहिणीने माझी खूप काळजी घेतली. सकाळी आणि रात्री मला औषधे द्यायची. पण मला वाटायचं की ती मला विष देत आहे. मला एवढं चांगलं कुटुंब मिळालं याचा मला अभिमान आहे. दुसरं कोणी असतं तर काय झालं असतं हेच कळत नाहीये. आता मी बरा झालोय. आयुष्यात काय होणार हे पाहू.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.