भाजपच्या बड्या नेत्याच्या पुतण्यासह तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
नाशिक : खरा पंचनामा
राजकीय गुंडांविरोधात नाशिक पोलीस सध्या अॅक्शन मोडवर आली आहे. काही राजकीय गुंडांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पाऊल उचलण्यास सुरूवात केलीये. पोलिसांनी राजकीय गुंड अर्थात नेत्यांसह काही समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. नुकतंच भाजपात प्रवेश करणाऱ्या मामा राजवाडे यांना ताब्यात घेतलं आहे. तर, शिंदे सेनेतील पवन पवार यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तर, भाजपचे नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुलसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नाशिकमध्ये सध्या पोलिसांकडून ऑपरेशन क्लीन अप सुरू आहे. ऑपरेशन क्लीन अपचा आज पाचवा दिवस. पोलिसांनी या कारवाईत भाजप नेते सुनील बागुल यांचे पुतणे अजय बागुल यांच्यासह तिघांना ताब्यात घेतलं आहे. गंगापूर नाका गोळीबारप्रकरणी अजय बागुलसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या सुनील बागुल यांचे पुतणे अजय बागुल यांच्यासह तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याआधी या प्रकरणी नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांचीही सध्या चौकशी सुरू आहे. दोन बड्या भाजप पक्षाच्या निगडीत व्यक्तींना ताब्यात घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.