IAS पत्नीचा पोलिसांना जोरदार दणका
अॅट्रॉसिटी कायद्यातील 'ते' कलम वाढणार...
चंदीगड : खरा पंचनामा
हरियाणातील पोलीस महानिरीक्षक वाय. पूरन कुमार यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यानुसार त्यांच्या पत्नी आयएएस अमनीत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. पण अमनीत यांनी त्यावर आक्षेप घेत एक महत्वपूर्ण कलम वाढविण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीनुसार पोलीस झुकले आहेत.
अमनीत पी. कुमार या सध्या हरियाणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. आत्महत्या केलेले वाय. पूरन कुमार हे त्यांचे पती होते. पूरन कुमार यांनी आत्महत्या केली त्यावेळी अमनीत कुमार या मुख्यमंत्र्यांसोबत जपान दौऱ्यावर होत्या. पूरन यांनी त्यांना सुसाईड नोट आणि मृत्यूपत्र पाठविले होते. जपानहून परतताच अमनीत यांनी पतीला न्याय मिळवून देण्यासाठी पोस्टमार्टमबाबत पहिला मोठा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले.
पूरन यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच अस्ट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी अमनीत यांनी मागणी केली. संबंधितांची पोलिसांत तक्रार केली होती. अमनीत यांच्या तक्रारीवरून डीजीपींसह 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पण त्यातील दोष त्यांनी दोन दिवसांपूर्वीच निर्दशनास आणून देत सुधारणा करण्याची पुन्हा मागणी केली होती.
आरोपींवर अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पोलिसांनी योग्य कलम लावले नसल्याची अमनीत यांची तक्रार आहे. एफआरआर मध्ये अस्ट्रॉसिटी कायद्यातील कलम 3(2) (V) वाढविण्याची मागणी त्यांनी केली होती. ही मागणी चंदीगढ पोलिसांनी मान्य केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.