ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण !
पुणे : खरा पंचनामा
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात कोयता गँगची दहशत अन् गुंडांच्या गँगवारनंतर आता खाकी वर्दी सुरक्षित राहिली नाही हे गेल्या काही दिवसांतील घटनांवरुन दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कोयत्याचा प्राणघातक हल्ला आणि आता अगदी क्षुल्लक कारणावरून भर रस्त्यात पोलिसांना बेदम मारहाण झाली. त्यानंतर रविवारी नोकरीवरुन घरी जाणाऱ्या एका वाहतूक पोलिसाला उंड्री पिसोळी परिसरात चार अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिस वेगाने कामाला लागले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, पुणे पोलिस दलातील पोलीस शिपाई प्रवीण डिंबळे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. लघुशंकेसाठी थांबल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय विद्यापीठ वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस शिपाई प्रवीण रमेश डिंबळे हे या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. काल रात्री (रविवार) डिंबळे हे त्यांचे काम संपवून घरी जात होते. उंड्री पिसोळीजवळील कॅनॉलच्या बाजूला, फर्निचरच्या दुकानाजवळ ते लघुशंकेसाठी थांबले होते. त्याचवेळी एका चारचाकी वाहनातून (कार) आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी थांबवली आणि प्रवीण डिंबळे यांना अचानक बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
टवाळखोरांकडून झालेल्या हल्ल्यानंतर पोलिस शिपाई डिंबळे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिस दलाकडून मारहाणकर्त्यांचा शोध सुरु आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.