बेडवरून पडले अन् पोलिसाला थेट मृत्यूने गाठलं!
सोलापूर : खरा पंचनामा
सोलापूर शहर वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार संभाजी शिवाजी दोलतोडे (वय 32, रा. अरविंद धाम, पोलीस वसाहत) यांच्या अकाली निधनाने सोलापूर पोलीस दलात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस अंमलदारच्या पत्नीने डॉक्टरांना सांगितले कि, रविवारी पहाटे 5 च्या सुमारास ते झोपेतच बेडवरून खाली पडले. डोकं जमिनीवर जोरात आदल्यामुळे डोक्याच्या मागील बाजूस जबर मार लागला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना त्वरित उलटी झाली. दरम्यान, त्यांना तातडीने सोलापूर शहरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर मृत घोषित केले.
संभाजी दोलतोडे यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांच्या पश्चात 8 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.