आता ईडीच्या नोटीसवर असणार क्यूआर कोड...
तोतयेगिरीला आळा बसणार
नवी दिल्ली : खरा पंचनामा
सक्तवसूली संचलनालयानं अर्थात ईडीनं दिल्या जाणाऱ्या सिस्टम जनरेटेड नोटीसवर आता क्यू आर कोड असणार आहे असं सांगितलं आहे. हा निर्णय कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी घेण्यात आला आहे.
गेल्या काही काळात देशभरात असे तोतय्या ईडी अधिकाऱ्यांच सुळसुळाट झाला होता. त्यांनी अनेक लोकांना करोडो रूपयांचा गंडा घातला होता. हाऊस अरेस्टचे प्रमाण देखील प्रचंड वाढले होते. त्यानंतर खुद्द पंतप्रधान आणि गृह मंत्र्यांना याबाबत आवाहन करावं लागलं होतं.
सक्तवसूली संचलनालयानं आपल्या अधिकाऱ्यांना ईडीची सिस्टम जनरेटेड नोटीस ही अत्यंत अपरिहार्य परिस्थितीत द्यावी असे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर ही सिस्टम जनरेटेड नोटीस ही व्यवस्थित सही शिक्क्यासह असली पाहिजे, त्यावर संपर्कासाठी त्या अधिकाऱ्याचा इमेल आयडी आणि फोन नंबर देखील असला पाहिजे असे आदेश देण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.