Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

समीर वानखेडे यांच्या मानहानी प्रकरणात न्यायालयाकडून नेटफ्लिक्सला समन्स

समीर वानखेडे यांच्या मानहानी प्रकरणात न्यायालयाकडून नेटफ्लिक्सला समन्स

दिल्ली : खरा पंचनामा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB), मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने नेटफ्लिक्स, शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट, आणि इतर संबंधित पक्षांना समन्स जारी केले आहेत.

ही कारवाई नेटफ्लिक्सवरील 'The Ba**ds of Bollywood' या वेब सिरीज संदर्भात करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांचा दावा आहे की, या सिरीजमधून त्यांची प्रतिष्ठा मलीन करण्यात आली आहे.

न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इतर प्रतिवादींना सात दिवसांच्या आत त्यांचे उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत आणि वानखेडे यांना याचिकेच्या प्रती देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील अंतरिम मनाई आदेशासाठीचा अर्ज ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणीसाठी निश्चित करण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या मानहानीच्या याचिकेच्या अनुषंगाने ही तारीख ठरवली असून, त्या दिवशी याचिकेच्या अनुषंगाने ही तारीख ठरवली असून, त्या दिवशी संबंधित पक्षांनी आपली बाजू न्यायालयासमोर मांडायची आहे.

वानखेडे यांच्या याचिकेत अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडसह नेटफ्लिक्स आणि इतर कंपन्यांचे नाव आहे. त्यांनी २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे, जी त्यांनी कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करावी असे म्हटले आहे.

'ही मालिका ड्रग्ज विरोधी अंमलबजावणी संस्थांचे दिशाभूल करणारे आणि नकारात्मक चित्रण करते, ज्यामुळे कायदा अंमलबजावणी संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होतो,' असे वानखेडे यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. समीर वानखेडे यांनी युक्तिवाद केला की, आर्यन खान आणि त्यांच्या संबंधित खटले अद्याप मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबईतील एनडीपीएस विशेष न्यायालयात प्रलंबित असतानाही, नेटफ्लिक्सवरील संबंधित मालिका 'जाणूनबुजून काल्पनिक रूपात तयार करण्यात आली आणि प्रदर्शित करण्यात आली'. त्यांच्या मते, या मालिकेमुळे त्यांच्या प्रतिमेला आणि सामाजिक प्रतिष्ठेला गंभीर हानी पोहोचली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.