दारुच्या दुकानातील एक्सपायरी डेट संपलेली बिअर प्यायल्याने ग्राहकाची प्रकृती बिघडली
कल्याण : खरा पंचनामा
कल्याण परिसरातील एका बिअर शॉपमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दारू दुकानात ग्राहकांना एक्सपायरी डेट संपलेल्या बिअर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक्सपायरी झालेली बिअर प्यायल्याने एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याचा प्रकार समोर आला.
मुदत संपलेली बिअर प्यायल्यानंतर प्रकृती खालावल्याची तक्रार उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानावर धाड टाकली. तपासात दुकानात मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी डेट संपलेल्या बिअर साठा आढळून आला आहे. विभागाच्या अधिकाऱ्याकडून तो साठा ताब्यात घेण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित बिअर शॉप मालकावर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एक्सपायरी बिअर विक्रीबाबत उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.