"देव देव तरी करायला सांगा किंवा विकास कामं सांगा"
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेपासून विविध विकास कामांच्या पाहणीसाठी दौरा सुरू झालाय. त्यांना वारजेतील विकास कामांची पाहणी केली. चौधरी चौकापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित होते.
अजित पवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. रिंगरोडची पाहणीही त्यांनी केली. दरम्यान, अजित पवार यांना एकाने दादा मंदिरात चला असं म्हटलं. यावर अजित पवार यांनी मिश्किल उत्तर दिलं.
अजित पवार पुण्यातील आहिरेगावात विकास कामांचा आढावा घेत होते. त्यावेळी आहिरेगावातल्या मंदिरातील पुजारी आणि स्थानिकांनी मंदिरात येण्याचा हट्ट केला. दादा मंदिरात चला असं एकाने म्हटलं. यावेळी अजित पवार यांनी हातच जोडले. अजित पवार म्हणाले की, साहेब मी तुमच्या पाया पडतो, मी विकास कामांसाठी पहाटे येत असतो. मला देवदेव तरी करायला लावा नाहीतर विकास काम तरी करायला लावा.
शिवने पुलावर पाहणी करत असताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला अजित पवार यांनी झापलंय. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे तक्रार केली की, नदीमध्ये कचरा टाकला जात आहे त्याबाबत महानगरपालिकेला व नागरिकांना आवाहन करावे. यावेळी अजित पवारांनी महानगरपालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्याला झापलं. आढाव आडनाव असल्याने अजित दादा म्हणाले, आढाव तुम्हाला आडवं करू का? पुण्यात चांगली काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. चांगलं काम केलं तर लोक नाव घेतात आणि केलं नाही तर बदली करा म्हणतात. रिझल्ट द्या, बिल्डर असू दे नाहीतर कोणी असू दे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.