Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डॉक्टर तरूणीच्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला अटकपहाटे चार वाजता पुण्यातील फार्महाऊसमध्ये सापडला

डॉक्टर तरूणीच्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला अटक
पहाटे चार वाजता पुण्यातील फार्महाऊसमध्ये सापडला

सातारा : खरा पंचनामा

फलटण येथील डॉक्टर तरूणी आत्महत्या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत बनकर या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेनंतर पोलिसांची पथके दोन आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती.

युवतीने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याने मानसिक व शारीरिक छळ केल्याची माहिती लिहिली होती. सातारा ग्रामीण पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे. प्रशांत बनकरला आज पहाटे चार वाजता अटक करण्यात आली आहे. तो मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसला होता, सातापा पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. प्रशांत बनकरला पुणे येथून अटक करण्यात आली आहे. प्रशांत बनकरला फलटण शहर पोलीस ठाण्यात येऊन येणार आहेत.

डॉक्टर तरुणीने हातावर लिहिलेलं सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा लिहिलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चक्र फिरवली. या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतर या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील आणखी एक पोलीस असलेला आरोपी त्याला अटक करण्यात आलेली नाही, तो फरार आहे, त्यामुळे पोलिसांच्या कामावर देखील संशय व्यक्त केला जात होता. या घटनेनंतर मोठ्या तणावाचा वातावरण निर्माण झालं होतं. प्रशांत बनकर याला मित्राच्या फार्महाऊसमधून ताब्यात घेण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणातच आरोपी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरती गंभीर आरोप करण्यात आले आहेत. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पोलीस उपनिरिक्षक गोपाळ बदनेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गोपाळ बदने हा महिलांची छेड काढायचा, डोळा मारायचा आणि तक्रार केल्यास पैसे मागायचा असं रुग्णांची नातेवाईक असलेल्या एका महिलेने म्हटलं आहे. तो अद्याप फरार असून त्याचाही पोलिस शोध घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.