Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल?

डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल?

सातारा : खरा पंचनामा

साताऱ्यातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाने खळभळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासात अनेक महत्वाची माहिती समोर आली आहे. डॉक्टर महिलेवर अत्याचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी गोपाळ बदने आणि पीडित महिलेचे घर मालक प्रशांत बनकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिस तपासात महत्वाची माहिती समोर आलीये.

डॉक्टर महिलेतील दोन्ही आरोप फरार असल्यामुळे पोलिसांच्या २ पथकांकडून शोध सुरु आहे. आता त्यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. डॉक्टर महिलेचे प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने यांच्याशी अनेकदा फोन कॉल झाल्याचंही समोर आलंय. या प्रकरणातील इतरही मुद्दे समोर आले आहेत.

डॉक्टर महिला गेल्या ८ महिन्यांपासून प्रशांत बनकर यांच्या घरात भाडेकरू होत्या. बनकर यांच्या आई त्यांना जेवणाचा डबा देत होत्या. २३ तारखेला पहाटे १.३० वाजता डॉ संपदा मुंडे यांनी फलटण येथील हॉटेल मधूदीपमध्ये चेक इन केलं.

डॉक्टर महिलेकडून हॉटेलची रूम २ दिवसांसाठी बुक केली. प्राथमिक तपासात हॉटेल मधुदीप येथे जात असताना डॉक्टर महिलेसोबत कोणी नव्हतं. डॉक्टर महिलेचं पी एस आय बदने आणि बनकर यांच्यात अनेक कॉल झाले.

पोलिसांनी डॉक्टर महिलेच्या हाताची मूठ उघडल्यानंतर हातावर लिहिलेला मजकूर समोर आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टर महिलेचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळे झाल्याचे समोर आले. तर मृत्यूपूर्वी कुठल्याही जखमा किंवा व्रण शरीरावर नसल्याचे स्पष्ट झाले.

मूळच्या बीड जिल्ह्याच्या डॉक्टर या प्रशांत बनकर यांच्या घरी भाडेकरू म्हणून ८ महिन्यापासून राहत होत्या. डॉक्टर महिला आणि प्रशांत बनकर यांच्यात जानेवारीपासून १५८ पेक्षा अधिक कॉल झाले. आत्महत्यापूर्वी डॉक्टर महिला आणि प्रशांत बनकर यांच्यात फोन कॉल झाला. व्हॉट्सअॅप कॉल डिलिट केल्यामुळे डॉक्टर महिलेच्या मोबाईलमधील मेसेज रिट्रीव करण्याची प्रक्रिया सायबर तज्ञांकडून सुरू झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.