लाच प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशींवर गुन्हा
नाशिक : खरा पंचनामा
अभोणा पोलिस ठाण्याचे तात्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी आणि एका पोलिस कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणीप्रकरणी कारवाई केली आहे. दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे.
१२ ऑगस्ट २०२५ रोजी तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांवरील गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात संशयितांनी सात जणांकडून प्रत्येकी १५,००० रुपये, तसेच तक्रारदाराचा मित्र गोपाल शेखावत यांच्या प्रकरणात २५,००० रुपये अशी एकूण १.३० लाख रुपयांची लाच मागितली होती. परदेशी यांनी ही रक्कम दुसऱ्या कर्मचाऱ्याद्वारे स्वीकारण्याचे सांगितल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक एकनाथ पाटील आणि पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या पथकाने केली. या घटनेने अभोणा पोलिस ठाण्यात खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.