राज ठाकरे आईसह मातोश्रीवर दाखल : राजकीय चर्चाना उधाण
मुंबई : खरा पंचनामा
राज आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधुंची जवळीक गेल्या काही महिन्यांपासून वाढली आहे. गेल्या आठवड्यात शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र आले होते, त्यानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा आज (12 ऑक्टोबर) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार असल्याची माहिती आहे. मातोश्री येथे राज ठाकरेंसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आहे. ठाकरे बंधूंच्या या भेटीमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थान येथे माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी मातोश्री येथे जात असल्याचे स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्यासोबत यावेळी त्यांच्या आई आहेत. ही कौटुंबिक भेट असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आजच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ठाकरे बंधूमध्ये सध्या उत्तम संवाद आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या भेटीमुळे महाराष्ट्रात नक्की काही चांगले घडेल, असा आशावाद नांदगावकरांनी व्यक्त केला. मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे की, या भेटी आता वारंवार होत राहणार आहेत. दोन्ही भावांमध्ये चांगले संबंध आणि संवाद आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आजची भेट पूर्णपणे कौटुंबिक असल्याचे म्हटले जात आहे. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला, मुलगा अमित, स्नुषा, मुलगी आणि राज यांच्या आई मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत. ठाकरे बंधूमध्ये गेल्या 20 वर्षांमध्ये असलेला कडवटपणा आता संपला असून वीस वर्षांनंतर ठाकरे कुटुंबातील नात्यात गोडवा आला असल्याचे बोलले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.