Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली जिल्ह्यातील तो पोलीस अधिकारी कोण?मोका रद्द करण्यासाठी खंडणी घेणाऱ्या संशयिताचा खास 'प्राण'

सांगली जिल्ह्यातील तो पोलीस अधिकारी कोण?
मोका रद्द करण्यासाठी खंडणी घेणाऱ्या संशयिताचा खास 'प्राण'

सांगली : खरा पंचनामा

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील गुंडांच्या टोळीचा मोका रद्द करण्यासाठी ६५ लाखांची खंडणी मागणाऱ्यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. यातील कोल्हापुरातील एका संशयित पोलिसाला निलंबितही करण्यात आले आहे. दुसरा संशयित हा सांगली जिल्ह्यातील तरूण, तडफदार आणि निडर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा खास 'प्राण' असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे खंडणीबहाद्दराचा खास असणारा सांगली जिल्ह्यातील तो पोलीस अधिकारी कोण? याची विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.

अकलूज येथील लक्ष्मण बनपट्टे याच्या टोळीविरोधातील मोक्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याकडे सोलापूर पोलिसांनी पाठवला होता. हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी कोल्हापूर मुख्यालयातील पोलीस अंमलदार मिलिंद नलावडे याच्यासह अन्य संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये हुपरी (जि. कोल्हापूर) येथील समीर पानारी याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. पानारी याला अटक झाल्यानंतर त्याचे लागेबांधे शोधले जात आहेत. त्यातच सांगली जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याचा तो 'प्राण' असल्याची खळबळजनक माहिती पुढे आल्याची चर्चा आहे.

सांगलीतील तो अधिकारी कोण? याची आता जिल्ह्यात चर्चा होऊ लागली आहे. खंडणीचा गुन्हा करण्यापूर्वी समीन पानारी याला सांगली जिल्ह्यातील त्या अधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळ पाहण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तो अधिकारी त्याचा 'प्राण' असल्याचे बोलले जात असून साहेबांचे अनेक कौतुकास्पद क्षण त्याने टिपल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात सध्या तरी तो पोलीस अधिकारी कोण याचीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी, माध्यमाचे प्रतिनिधी यांना न घाबरणारा असा दबंग अधिकारी असल्याचीही चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.