पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू!
पुणे : खरा पंचनामा
अमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी अझीम अबू सालेम ऊर्फ 'अझीम भाऊ' (वय ५०, रा. उरण) याचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने कोंढव्यातून त्याला ताब्यात घेतले होते. ससून रुग्णालयात उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
काशीगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात आरोपी अझीम सालेम फरार होता. पोलिस तपासात तो पुण्यातील कोंढवा येथील हिल मिस्ट गार्डन, जी विंगमधील एका सदनिकेत लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी मीरा-भाईंदर पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले.
पोलिसांनी अझीम सालेमला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयाकडे नेले. मात्र वाटेतच त्याची तब्येत अचानक बिघडली. ससून रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.