प्रेमसंबंधात बहिणीला फसवले, महिलेने दिराचे गुप्तांग कापले
लखनऊ : खरा पंचनामा
दीरावर हल्ला करून त्याचे गुप्तांग कापल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेशमधील मउआइमा येथील मलखानपूर गावातील महिलेला अटक करण्यात आली आहे. आपल्या लहान बहिणीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी महिलेने हे धक्कादायक कृत्य केल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे.
१६ ऑक्टोबरच्या रात्री उ मलखानपूर गावातील राम आसरे यांचा २० वर्षांचा मुलगा उमेश हा त्याच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या किंकाळ्यांनी जागे झालेल्या कुटुंबातील सदस्यांनी धाव घेतली असता, त्यांना तो तीव्र वेदनेत विव्हळत असल्याचे दिसले. त्याच्या शरीरावर चाकूचे गंभीर वार होते आणि त्याचे गुप्तांग कापलेले होते. कुटुंबीयांनी तातडीने उमेशला रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांत अज्ञात हल्लेखोराविरुद्ध" तक्रार नोंदवली. या सर्व प्रकाराचा तपास करताना पोलीसही सुरुवातील गोंधले होते. सुरुवातीला हे कृत्य कोणी केले आणि का केले, याचा अंदाज कोणालाच लागत नव्हता.
पोलिसांनी अधिक खोलवर तपास केल्यावर कुटुंबातील गुंतागुंतीच्या नात्यांचा खुलासा झाला. उमेशचा मोठा भाऊ उदय याचे लग्न मंजू नावाच्या महिलेशी झाले होते. काही दिवसांनी उमेशचे मंजूच्या लहान बहिणीसोबत जवळचे संबंध जुळले. दोघांमध्ये जवळीक वाढली होती आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याची शपथही घेतली होती. मात्र, कुटुंबातून विरोध सुरू झाला. एकाच नात्यातील इतक्या जवळचा विवाह आसरे कुटुंबाला मान्य नव्हता. अखेरीस, उमेशने या संबंधातून माघार घेतली, तसेच त्याने दुसऱ्या एका महिलेशी सूत जळवले.
पोलीस तपासात स्पष्ट झाले की, उमेशने नाकारल्यामुळे मंजूच्या लहान बहिणीला मोठा धक्का बसला. ती नैराश्यात गेली आणि तिने स्वतःला एकटे पाडून घेतले. आपल्या बहिणीचे दुःख पाहून मंजूच्या मनात उमेशबद्दलचा राग आणि तिरस्कार वाढू लागला. पोलिसांचा विश्वास आहे की याच भावनिक संतापातून तिने सूडाचे हिंसक कृत्य करण्याचा कट रचला. १६ ऑक्टोबरच्या रात्री मंजूने घरातील सर्व लोक झोपी जाण्याची वाट पाहिली. मध्यरात्रीच्या सुमारास, तिने स्वयंपाकघरातील चाकू घेतला आणि शांतपणे उमेशच्या खोलीत प्रवेश केला. अचानक आणि संतापाच्या भरात तिने त्याच्यावर अनेक वार केले आणि त्यानंतर त्याचे गुप्तांग कापले. उमेश मदतीसाठी ओरडला, पण त्याचे कुटुंबीय त्याच्यापर्यंत पोहोचले तोपर्यंत मंजू तेथून पळून गेली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला पाहून त्याच्या भावाला मोठा धक्का बसला. कुटुंबाने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर दीड तासाहून अधिक काळ तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.