Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रेमविवाह केलेल्या पत्नीला मारहाणपोलीस अंमलदारासह आई वडिलांवर गुन्हा

प्रेमविवाह केलेल्या पत्नीला मारहाण
पोलीस अंमलदारासह आई वडिलांवर गुन्हा

पुणे : खरा पंचनामा

आईवडिलांच्या विरोधात प्रेम विवाह करणाऱ्या पोलीस अंमलदाराने लग्नानंतर पत्नीचा छळ सुरू केला. ऐन दिवाळीत आजारी पत्नीने मला दवाखान्यात घेऊन जा, म्हटल्यावर तिला मारहाण करून जखमी करण्याची घटना घडली. खडक पोलिसांनी या पोलीस अंमलदाराबरोबर त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

ज्ञानेश्वर गोपाळ तायडे (वय २८), गोपाळ तायडे (वय ५३), अंजना गोपाळ तायडे (वय ४५, सर्व रा. खडकमाळ पोलीस लाइन) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ज्ञानेश्वर गोपाळ तायडे यांच्या पत्नीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ज्ञानेश्वर हा पुणे पोलीस दलात बँड पथकात नियुक्तीला आहे. फेसबुक वरून त्यांच्यात मैत्री झाली. त्याने आई वडिलांचा विरोध असताना ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रेम विवाह केला. त्यानंतर त्यांच्यात बदल झाला. तो घरात किराणा सामान भरण्यासाठीही पैसे देत नाहीत. फिर्यादी यांना किरकोळ कारणावरून शिवीगाळ, मारहाण करत. त्याचे आई वडील फिर्यादीला म्हणत असत की, तू ज्ञानेश्वरबरोबर प्रेमविवाह केल्याने आम्हाला काही मिळाले नाही. तू इथे राहू नकोस, मी त्याचे लग्न भावाच्या मुलीबरोबर लावून देते, असे म्हणून सतत शिवीगाळ करत असत. त्यांना ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुसरी मुलगी झाली, तरी त्याच्या वागण्यात सुधारणा झाली नाही.

दिवाळीच्या दिवसात सामान भरण्यासाठी पैसे मागितले तर, त्याने पैसे दिले नाही. गेल्या ४, ५ दिवसापासून फिर्यादी आजारी होत्या, तेव्हा सोमवारी त्यांनी मला दवाखान्यात जाऊन जा, असे म्हटल्यावर त्याने तिला मारहाण केली. या मारहाणीत तिच्या कंबरेला दुखापत झाली. ती जागची हलू शकत नव्हती. शेवटी तिने ११२ वर फोन करुन पोलीस मदत मागितली. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून तिला ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक अलका जाधव तपास करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.