"महिला आयोगाच्या कार्यालयाला टाळे ठोकून राष्ट्रवादीच्या प्रचारासाठीच फिरा"
बीड : खरा पंचनामा
सातारा जिल्ह्यातील फलटण उप जिल्हा रुग्णालयात कार्यरत आणि मूळ बीड जिल्ह्याची रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईडनोट आढळून आली असून, त्यामध्ये काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुसाईडनोटमध्ये नमूद केल्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने संबंधित महिला डॉक्टरवर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख आहे. तसेच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीने तिला मानसिक त्रास दिल्याचेही लिहिले आहे. या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता करुणा शर्मा यांनी यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनी महिला डॉक्टरच्या पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, महिला डॉक्टरची आत्महत्या नसून ही हत्या आहे. महिलांबाबतीत शासन काम करत नाही. शासन झोपलेले आहे, असे म्हणत करून त्यांनी महिला आयोगावर निशाणा साधला. महिला आयोगाच्या कार्यालयाला टाळे लावून तुम्ही फक्त राष्ट्रवादीचाच प्रचार करण्यासाठी फिरा, अशी संतप्त टीका करुणा शर्मा यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर केली. तर यातील इतर दोषींवर कारवाई करून सहआरोपी करा. मुख्यमंत्र्यांना हे करता येत नसेल तर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील करुणा शर्मा यांनी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.