सलमान खानचे एक विधान अन् पाकने सरळ दहशतवादी म्हणूनच घोषित केले!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पाकिस्तान सरकारने थेट दहशतवादी घोषित केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. नुकतेच सौदी अरेबियातील एका कार्यक्रमादरम्यान सलमान खानने बलुचिस्तानचा उल्लेख हा वेगळा देश म्हणून केला होता.
यामुळे पाकिस्तानमधील शाहबाज शरीफ सरकार नाराज झाले असून त्यांनी दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित करणारी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे सलमान खानचे नाव हे चौथ्या अनुसूचीत टाकले असून त्याला पाकिस्तान सरकार अटक करू शकते. पण, पाकिस्तानच्या या निर्णयामुळे आता पुन्हा एकदा देशात त्यांच्या अजब कारवायांची चर्चा सुरु झाली आहे.
सलमान खानने सौदी अरेबियातील रियाधमध्ये झालेल्या 'जॉय फोरम 2025' कार्यक्रमात शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासोबत हजेरी लावली होती. मध्यपूर्वेत भारतीय चित्रपटांची लोकप्रियता सांगताना तो म्हणाला होता की, "इथे बलुचिस्तान, अफगाणिस्तान, अगदी पाकिस्तानमधीलही लोक आहेत. सर्वजण इथे काम करतात." या विधानात त्याने बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा वेगळा उल्लेख केल्याने पाकला मिरच्या झोंबल्या असल्याचे समोर आले आहे. समाज माध्यमांवर सलमान खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सलमान खानने हे विधान चुकून केले, की मुद्दाम अशी चर्चा रंगली आहे. आतापर्यंत सलमान किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पाकिस्तान सरकारने सलमान खानच्या विधानाला देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला मानला जात आहे. त्यामुळेच सरकारने त्याला दहशतवादी म्हणून घोषित करत, त्याचे नाव 1997 च्या दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या अनुसूचीमध्ये टाकले आहे. या कायद्यानुसार संबंधित व्यक्तीवर कडक पाळत ठेवली जाते, तसेच त्यांच्या हालचालींवर निर्बंध येतात. दुसरीकडे, सलमान खानच्या विधानावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. एका बलोच नेत्याने सार्वजनिकरित्या सलमानचे आभार मानले. तो म्हणाला की, या विधानामुळे 60 दशलक्ष बलोच नागरिकांना आनंद झाला असून हे विधान बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी, हा संदेश जगाला देते." बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत असून तिथे दीर्घकाळापासून स्वातंत्र्याची चळवळ सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.