Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आमदार निवासातील कॅन्टीनवरील कारवाई मागे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून 'क्लीन चिट'

आमदार निवासातील कॅन्टीनवरील कारवाई मागे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून 'क्लीन चिट'

मुंबई : खरा पंचनामा

शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिळे अन्न दिल्यामुळे आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अजिंठा केटरर्स या कॅन्टीनचा परवाना निलंबित केला होता. मात्र, अवघ्या महिनाभरातच ही कारवाई मागे घेतली आहे.

उपाहारगृहामध्ये कोणतेही अवैध खाद्यपदार्थ आढळून आले नसल्याचे सांगत अन्न व औषध प्रशासनाने नावापुरतीच कारवाई केल्याचे समोर आले आहे. आमदार निवासच्या कॅन्टीनमधील अन्नपदार्थांवरून अनेकांनी तक्रारी नोंदवल्या. मात्र गायकवाड यांच्या मारहाणीनंतर उपाहारगृहातील कॅन्टीनच्या दर्जाचा विषय राजकीय व प्रशासकीय वर्तुळामध्ये चर्चेत आला. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत विधानसभेमध्येही चर्चाही झाली.

विधानसभेच्या अध्यक्षांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अन्न व प्रशासन विभागाने तपासणीवेळी परवानाधारक कायद्यातील ल तरतुदींचे गंभीर उल्लंघन करून अन्न पदार्थ साठवणूक, अन्न पदार्थ तयार करणे व विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्याचे सांगितले होते. सर्व आरोप विभागाने मागे घेतले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.