शाळेत विद्यार्थ्याच्या कानशिलात मारल्याने शिक्षकावर गुन्हा दाखल
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील वाघोली परिसरातील एका शाळेत शिक्षिकेने सातवीच्या विद्यार्थ्याला जोरदार कानशिलात लगावली. त्यामुळे पोराचा कान दुखावला व त्याला रुग्णालयात भरती करावा लागलं असा आरोप पालकांनी केलाय. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी 2945/2025 नुसार शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सध्या मुलावर खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
पुण्यातील वाघोली परिसरात एका शाळेत सातवीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने सातवीतल्या मुलाला मारहाण केल्याचा प्रकारसमोर आला आहे. चैतन्य टेक्नो स्कूल या शाळेत घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 2945 / 2025 नुसार शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. पालकांचा आरोप आहे की शाळेच्या शिक्षिकेच्या मारहाणीमुळे मुलाला गंभीर मानसिक धक्का बसला असून त्याच्या आरोग्यावरही परिणाम झालाय .
आईने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास सात्विक शिकणाऱ्या विद्यार्थी यथार्थ यादव (वय 12) याला शिक्षिका तृप्ती सक्सेना यांनी भर वर्गात कानशिलात लगावली. या मारहाणीमुळे विद्यार्थ्यांच्या कानाला दुखापत झाली व तीव्र वेदना होऊ लागल्या. यानंतर यथार्थला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले .डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कानाला दुखापत झाल्याचा वैद्यकीय अहवाल दिला आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थ्याच्या आईच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट मुलाला वर्गातून बाहेर काढण्यात आले असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.