'माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही'
नवी दिल्ली : खरा पंचनामा
सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने शूज भिरकावला. सुदैवाने तो शूज सरन्यायाधीशांच्या बेंचपर्यंत पोहोचला नाही. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
या धक्कादायक घटनेमुळे विचलित न होता, सरन्यायाधीश गवई म्हणाले, 'अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणारा होणार नाही आणि सुनावणी पुढे सुरू ठेवा'.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीशांनी दिवसाची पहिली सुनावणी सुरू केली असतानाच त्या वृद्ध व्यक्तीने 'हिंदुस्तान सनातनचा अपमान सहन करणार नाही' अशा घोषणा देत न्यायाधीशांच्या बेंचच्या दिशेने शूज भिरकावला. न्यायालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.
शूज फेकणाऱ्या व्यक्तीकडे सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि क्लार्क यांना दिले जाणारे प्रॉक्सिमिटी कार्ड होते. त्या कार्डवर किशोर राकेश असे नाव आहे. त्याने सरन्यायाधीशांना का लक्ष्य केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि सुरक्षा यंत्रणा अधिक माहितीसाठी त्याची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीशांनी रजिस्ट्रीला त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई न करण्याचे सांगितले आहे.
घटनेच्या वेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या एका वकिलाने सांगितले की सरन्यायाधीश संपूर्ण वेळ शांत होते. ते म्हणाले, 'अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणारा नाही. कृपया (सुनावणी) पुढे चालू ठेवा'.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.