निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द
पुणे : खरा पंचनामा
निलेश घायवळ प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर जारी झाली आहे.
पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत. पुण्यातील कोथरूडमधील गोळीबारानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ चर्चेत आला होता, त्यावेळी तपासामध्ये समोर आलं की पोलिसांना चकवा देत घायवळ परदेशात पळून गेला. विशेष म्हणजे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला याविषयी पोलिस प्रशासनावरच ताशेरे ओढले जात होते. घायवळने पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अहिल्यानगरमधील आपल्या गावाच्या पत्तावर त्याने पासपोर्ट काढला. विशेष म्हणजे पासपोर्टसाठी त्याने आपल्या आडनावात देखील बदल केला. 'घायवळ' ऐवजी 'गायवळ' नावाची कागदपत्रे त्याने सादर केली. आता त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.
गायवळ नावावर कोणतेही गुन्हेगारी कृत्य नोंद नसल्याने पोलिसांनी त्याला एनओसी दिले. तसेच पासपोर्ट ऑफीसला आपल्यावर गुन्हा दाखल नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र देखील त्याने दिले होते. यामुळे त्याला पासपोर्ट मिळाला. मात्र, परदेशात पळून गेलेल्या घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. निलेश घायवळ याने पासपोर्टसाठी खोटी कागदपत्रे तयार केली. पोलिस रिकोर्डमध्ये त्याचे नाव निलेश घायवळ आहे. त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी त्याने निलेश गायवळ नावाने आधारकार्ड काढले. गायवळ नावाचे गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याने पासपोर्ट काढणे त्याला शक्य झाले. गुन्हे दाखलची माहिती मिळाली नाही. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घायवळची बँक खाती गोठवण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, 'कोथरूड गोळीबार प्रकरणात 'मकोका' कारवाई केल्यानंतर परदेशात पसार झालेला गुंड निलेश घायवळचे पासपोर्ट रद्द करण्यात येणार आहे,' अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काल (शुक्रवारी, ३) दिली. घायवळने बनावट कागदपत्रे, माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळविल्याचे तपासात उघड झाले आहे. पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट विभागातील अधिकाऱ्यांनी (शुक्रवारी, ३) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणी चर्चा केली. कोथरूड गोळीबार प्रकरणात घायवळ परदेशात पसार झाला. घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी 'गायवळ' असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली. ही कागदपत्रे अहिल्यानगर पोलिसांकडे सादर करून त्याने तत्काळ पासपोर्ट मिळवला असल्याची माहिती आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.