"कोणाला मुख्यमंत्री करणारा मी कोण...?"
नवी दिल्ली : खरा पंचनामा
बिहारमधील निवडणूक प्रचार आता शिगेलापोहच आहे. दरम्यान, जर यंदाच्या निवडणुकीत एनडीएचा विजय झाला तर विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार का असा प्रश्न सातत्यानं चर्चेत असतो.
याबाबत आता भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी भाजपचा नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलं. त्यांनी हे वक्तव्य एका मुलाखतीदरम्यान केलं.
अमित शहा यांनी आमचा पक्ष हा NDA आणि त्यातील घटक पक्षांचा आदर करतो असं सांगितलं. मात्र मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय हा निकालानंतरच घेण्यात येईल असं ते म्हणाले.
कोणाला मुख्यमंत्री करणारा मी कोण? आमच्या युतीत अनेक पक्ष आहेत. निवडणूक झाल्यानंतर आम्ही सर्व एकत्र बसू आणि मुख्यमंत्री कोणाला करायचं याचा निर्णय घेऊ. आता आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत.'
अमित शहा यांना जर भाजपचे इतर घटक पक्षांपेक्षा जास्त आमदार निवडून आलं तर काय असं देखील विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी, 'आता देखील आमच्याकडं जास्त आमदार आहेत. मात्र तरी देखील नितीश कुमारच मुख्यमंत्र आहेत. राजकारण हे टीआरपीसाठी होत नाही. तुम्ही मला नंतर काय होणार असा प्रश्न विचारला होता. मी त्याचं उत्तर दिलं आहे.'
सध्या बिहारमध्ये एनडीएचं सरकार असून त्यात ८४ जागा जिंकणारा भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. दुसरीकडं जनता दल युनायटेड यांना फक्त ४८ जागा जिंकता आल्या आहेत. अमित शहा यांनी नितीश कुमार यांनी इतिहासात काँग्रेस पक्षाला विरोध केल्याचं सांगितलं.
'नितीश कुमार हे भारतीय राजकारणातील एक अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या राजकीय जीवनात ते कधीही काँग्रेससोबत जास्त काळ राहिले नाहीत. काँग्रेससोबत असतानाही त्यांनी अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र काम केले नाही. त्यामुळे, जर आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या राजकीय जीवनाचे मूल्यांकन करायचे असेल, तर हा महत्त्वपूर्ण काळ विचारात घ्यायला हवा. ते एक समाजवादी नेते आहेत; त्यांच्या राजकीय जन्मापासूनच त्यांनी काँग्रेसला विरोध केला आहे. जेपी आंदोलनादरम्यानही त्यांनी काँग्रेसविरोधात लढा दिला. मला विश्वास आहे की भाजपचा नितीश कुमार यांच्यावर निश्चितच विश्वास आहे, पण त्याहून अधिक बिहारच्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे,' असे अमित शहा म्हणाले.
२०२० च्या निवडणुकांची आठवण करून देत, अमित शहांनी सांगितले की, 'नितीश कुमार यांनी भाजपला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, परंतु पंतप्रधान मोदींनी त्यांचे ज्येष्ठत्व विचारात घेतले आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला.'
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.