दिवसा घरे फोडणाऱ्या बीड येथील टोळीतील एकाला अटक
आष्टी येथे सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
इस्लामपूर, शिराळा परिसरात दिवसा घरे फोडून ऐवज लंपास करणाऱ्या बीड जिल्ह्यातील टोळीतील एकाला अटक करण्यात आली आहे. यातील एकजण पसार झाला असून एकाला आळेफाटा पोलिसांनी अटक केल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
संतोष मरदान भोसले (रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर मोहन निकळज्या भोसले याला आळेफाटा पोलिसांनी अटक केली असून अतुल नवनाथ काळे (रा. वाकी, जि. बीड) हा पसार झाला आहे. इस्लामपूर, शिराळा परिसरात झालेल्या घरफोडीमधील चोरट्याना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तयार केले होते. तांत्रिक माहितीच्या आधारे या चोऱ्या आष्टी येथील टोळीने केल्याची माहिती संदीप गुरव, उदयसिंह माळी यांना मिळाली.
त्यानंतर पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने संतोष भोसले याला अटक केली तर मोहन भोसले याला पूर्वीच आळेफाटा पोलिसांनी अटक केली होती. भोसले याने शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, संदीप गुरव, उदयसिंह माळी, अतुल माने, सतीश माने, अरुण पाटील, अमीरशा फकीर, रणजीत जाधव, मच्छिद्र बर्डे, संकेत कानडे, सुरज थोरात, अभिजीत माळकर, सुशांत चिले, आष्टी पोलीस ठाण्यातील प्रवीण क्षीरसागर, मजरुद्दीन सय्यद, सांगली सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजीत पाटील, अजय पाटील, शांता कोळी यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.