अतिरिक्त पोलीस महासंचालकांची गोळया झाडून घेऊन आत्महत्या
चंदीगड : खरा पंचनामा
हरियाणाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय एस पूरन यांनी चंढीगढमध्ये स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. त्यांची पत्नी आयएएस अधिकारी असून त्या मुख्यमंत्री मनोहर लाल सैनी यांच्यासोबत जपान दौऱ्यावर आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय एस पूरन यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पूरन यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पूरन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणाची पुढील तपास देखील सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतिरिक्त पोलीस महासंचालक पूरन यांची पत्नी आयएएस अधिकारी आहेत. त्या सध्या जपान दौऱ्यावर आहेत. प्रशासनाने त्वरित घटनास्थळी पोहोचून कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी संपूर्ण क्षेत्राला घेरा घालून तपास सुरु केला आहे. घटनास्थळी कोणत्याही प्रकारची चिठ्ठी मिळाली नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी आता घटनास्थळी आणि घराच्या आसपास असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या आत्महत्येने पोलीस दल आणि प्रशासनात शोककळा पसरली आहे. त्यांच्या टोकाच्या निर्णयाने सर्वच विभागात खळबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आयपीएस वाई पूरन कुमार हरियाणाच्या २००१ सालच्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी होते.
पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाचा बारकाईने तपास केला जाईल. लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलीस आणि प्रशासनाने केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.