प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह कालवश; चित्रपटसृष्टीवर शोककळा
मुंबई : खरा पंचनामा
आपल्या विनोदी आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेले जेष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे आज, शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मूत्रपिंडाच्या विकारांमुळे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट आणि टीव्ही सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सतीश शाह यांना 'साराभाई व्हर्सेस साराभाई या लोकप्रिय टीव्ही मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत त्यांनी साकारलेला 'इंद्रवदन साराभाई' हा मिश्किल आणि खोडकर वडिलांचा आणि सासऱ्यांचा रोल प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील. रत्न पाठक शाह यांच्यासोबतची त्यांची जुगलबंदी विशेष गाजली होती.
सतीश शाह यांनी आपल्या ५० वर्षांहून अधिकच्या अभिनय कारकिर्दीत २०० हून अधिक चित्रपट आणि अनेक मालिकांमध्ये काम केले. विशेषतः त्यांच्या विनोदी भूमिका खूप गाजल्या.
सतीश शाह यांच्या निधनाने भारतीय मनोरंजन सृष्टीतील एका हरहुन्नरी आणि नैसर्गिक विनोदी अभिनेत्याची जागा आता रिक्त झाली आहे. त्यांचे 'इंद्रवदन साराभाई' म्हणून केलेले काम आणि त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांना दिलेला आनंद नेहमीच चिरंजीव राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो !
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.