मारहाण थांबवायला १० हजार मागितले, शेवटी मारहाणीतच मृत्यू
दोन हवालदारांना अटक
भोपाळ : खरा पंचनामा
पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यापूर्वी मारहाण थांबवण्यााठी पोलिसांनी त्याला चक्क १० हजार रुपयेही मागितले. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी आता दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, उदित गायके असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर कॉन्स्टेबल संतोष बामनिया आणि सौरभ आर्यवर असं आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. गेल्या शनिवारी उदित त्यांच्या मित्रांसह पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टी झाल्यानंतर रात्री १ च्या सुमारास एकमित्र त्याला घरी सोडण्यासाठी निघाला. पण वाटेत पोलीस दिसताच त्याच्या मित्राने गाडी दुसऱ्या रस्त्याने वळवली.
दरम्यान, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना पडकडे. तसेच त्यांच्याकडे विचारपूस केली. मात्र, त्यानंतर त्यांनी उदितला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकच नाही, तर मारहाण थांबवायची असेल १० हजार रुपये दे अशी मागणी त्यांनी केली. या मारहाण उदित गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याल मृत घोषित केलं.
महत्त्वाचे म्हणजे त्याच्या मित्राने या संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद केला असून हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होतो आहे. यात दोन्ही पोलीस कर्मचारी उदितला मारहाण करताना दिसत आहेत. उदिच्या उत्तरीय तपासणीमध्ये स्वादुपिंडाच्या रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याची माहिती भोपाळ झोन-२ चे पोलिस उपायुक्त विवेक सिंह यांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात कायदेशीर करावाई करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.