पत्रकार मारहाण प्रकरणात जयंत पाटलांना कोर्टाने ठरवलं दोषी
रायगड : खरा पंचनामा
अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर येथील अलिबागच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. या प्रकरणात आता न्यायालयाने निर्णय दिला असून जयंत पाटलांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. बी. अत्तार यांनी एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र आणि पाच हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही जयंत पाटलांना दिले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणी सुरू असताना जिल्हा क्रीडासंकुलातील मतमोजणी केंद्रावर राडा झाला होता. त्यावेळी पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण झाली होती. तर ही मारहाण जयंत पाटील यांनी केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी 24 मे 2019 मध्ये जयंत पाटील, पंडित ऊर्फ सुभाष पाटील आणि अभिजीत कडवे यांच्यावर अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
अलिबाग पोलिस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी या प्रकरणाचा तपास करून अलिबाग येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांच्या न्यायालयात सुरू होती.
ज्यानंतर या प्रकरणात जयंत पाटील यांना न्यायालयाने दोषी ठरवत नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याचे आता आगामी स्थानिकर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.