Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले निघाला मोबाईल चोर!सुरत पोलिसांनी व्हिडिओ केला व्हायरल

बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले निघाला मोबाईल चोर!
सुरत पोलिसांनी व्हिडिओ केला व्हायरल

लातूर : खरा पंचनामा

झुकेगा नही साला म्हणणारा बॉस म्हणजेच वादग्रस्त आणि बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेने मोबाईल चोरी केलं असल्याचं समोर आलं आहे. सुरत पोलिसांनी रणजीत कासलेचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

वादग्रस्त आणि बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले काही दिवसापूर्वी सुरतला गेला होता. सुरत या ठिकाणी तपासाच्या नावाखाली दोन मोबाईल आणि दोन लाखापेक्षा आधीची रक्कम लुटल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही सुरत पोलिसांना मिळाला. तक्रार आल्यानंतर त्यांनी तपास करत रणजीत कासले याला लातूर येथून अटक केली होती.

तपासाच्या नावाखाली दोघांना धाकदपटशहा करत त्यांची मोबाईल हिसकावून घेऊन जात असलेल्या रणजीत कासले व्हिडिओमध्ये आहे. त्यानंतर सुरत पोलिसांनी गुन्हा कबूल करत माफी मागणाऱ्या रणजीत कासलेचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. तीन दिवसांपूर्वी रणजीत कासले यास गुजरात पोलिसांनी लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर बॉसला अटक झाली असं सांगत पुष्पा चित्रपटातील अॅक्शन करत रणजीत कासले गाडीत बसला होता. स्वतःला बॉस म्हणून घेणारा रणजीत कासले सुरतला गेल्यानंतर हात जोडत माफी मागताना दिसला.

बीड जिल्ह्यातील बडतर्फ असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले याला दोन दिवसांपूर्वी २० ऑक्टोंबरला मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात पोलिसांनी लातूरमधून अटक केली. गुजरात राज्यातील सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जबरी घरफोडी प्रकरणी अटक असलेल्या आरोपींकडून रणजीत कासले यांच्याबाबत माहिती मिळाली. या आरोपींना मदत करणे किंवा इतर सहकार्य पुरवणे अशा स्वरूपाचा संशय गुजरात पोलिसांना असल्याकारणाने त्यांनी दोन दिवसा लातूर शहरात रणजीत कासले यास अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती.

लातूर पोलीस त्याचबरोबर गुजरात पोलीस यांनी एकत्रित केलेल्या मोहिमेमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रणजीत कासले यास गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कागदपत्राची पूर्तता करून सहा जणांच्या पथकाने रणजीत कासले यास गुजरात येथील सुरत भागातील पाल पोलीस स्टेशनकडे घेऊन गेले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर वाल्मीक कराड याबाबतच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रणजीत कासले यांनी व्हायरल केल्या होत्या. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांवर थेट आरोप केले होते.

सदर प्रकरणी रणजीत कासले यास अटकही करण्यात आली होती. वेगवेगळ्या प्रकरणी आत्तापर्यंत सात गुन्हा रणजीत कासले याच्यावर दाखल आहेत. गुजरात पोलिसांचा हा आठवा गुन्हा. बडतर्फ झाल्यानंतर रणजीत कासले याने मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हिडीओ करत अनेक खुलासे केले आहेत. अनेक नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर आरोपही केले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.