Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून छळ झाल्यामुळे पतीनं आयुष्य संपवलं"

"उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून छळ झाल्यामुळे पतीनं आयुष्य संपवलं"

चंदीगड : खरा पंचनामा

हरियाणातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आयपीएस वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणात बरेच खुलासे उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, आता त्याच्या पत्नीनं मोठा खुलासा केला आहे. त्यांनी गंभीर आरोप केले असून, उच्चपद्धस्त अधिकाऱ्यांकडून छळ झाल्यामुळे पतीनं आयुष्य संपवलं असल्याचं सांगितलं.

वरिष्ठ पोलिस अधिकारी वाय. पूरन कुमार यांची पत्नी अमनीत पी. कुमार या आयएएस अधिकारी आहेत. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनं बुधवारी दावा केला की, उच्चपद्धस्थ अधिकाऱ्यांकडून छळ झाल्यामुळेच पूरन यांनी आत्महत्या केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

वरिष्ठ पोलिस अधिकारी वाय. पूरन कुमार हे २००९ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी होते. मंगळवारी ते चंदीगड येथील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. या प्रकरणी अमनीत कुमार यांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

अमनीत कुमार यांनी चंदीगड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तसेच रोहतक पोलिसांकडे एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरूद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०६ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीही केली.

सुत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतः स्वाक्षरी केलेली सुसाईड नोट ठेवली आहे. त्यांनी त्यात आपल्या कारकिर्दीत आलेल्या अंसख्य समस्यांचा उल्लेख केला आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.