Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात चक्क पोलिसच आपापसात भिडले

राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात चक्क पोलिसच आपापसात भिडले

मुंबई : खरा पंचनामा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित सरकारी कार्यक्रमाबाहेर आज अनपेक्षित घटना घडली. कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्थापन आणि वाहतूक नियंत्रणावरून वरिष्ठ आणि कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये तीव्र बाचाबाची झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

माहितीनुसार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पायलट कारच्या योग्य ठिकाणी तैनातीबाबत मतभेद झाले. एक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना वाहनाचे स्थान बदलण्याचे आदेश दिले. मात्र कनिष्ठ अधिकाऱ्यांनी हे आदेश न पाळल्याने दोघांमध्ये तणाव निर्माण झाला.

याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी मोठ्याने बोलणे, आदेशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि तिथेच बाचाबाची घडली.

मुंबई पोलिस दल हे देशभरात त्यांच्या शिस्त आणि तत्परतेसाठी ओळखले जाते, मात्र या घटनेमुळे पोलिस दलातील आंतरिक अस्वस्थता पुन्हा चर्चेत आली आहे.

कार्यक्रमादरम्यान अशा प्रकारची बाचाबाची होणे हे प्रोटोकॉल आणि पोलिस शिस्तीचे उल्लंघन मानले जात आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.