अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक
बनावट बँक गॅरंटी रॅकेट प्रकरणी ईडीची कारवाई
मुंबई : खरा पंचनामा
भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (10 ऑक्टोबर) रिलायन्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 13 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
दरम्यान, कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सक्तवसुली संचालनालयाने उद्योगपती अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक केली आहे. बनावट बँक गॅरंटी रॅकेट प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने रिलायन्स पॉवरचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) अशोक कुमार पाल यांना अटक केली आहे. ही कारवाई 68.2 कोटी रुपयांच्या बनावट बँक गॅरंटी प्रकरणाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कारवाईनंतर कंपनी आणि शेअर बाजारात खळबळ उडाली असून या प्रकरणाच्या तपासाची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणात ओडिशातील कंपनी बिस्वाल ट्रेडलिंकचा सहभाग देखील असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले आहे, जी बनावट बँक गॅरंटी बनवत होती. ही कारवाई धन शोधन निवारण अधिनियमच्या (PMLA) तरतुदींनुसार करण्यात आली आहे.
रिलायन्स समूहाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मनी लॉन्ड्रेिगसारख्या गैरकायदेशीर प्रक्रियेमध्ये सहभागी होत नियमांचे उल्लंघन केल्याचा अशोक कुमार पा यांच्यावर आरोप आहेत. पाल यांनी समूहाच्या निधीचा गैरवापर करून आर्थिक घोटाळ्यात भूमिका बजावल्याचा दावा देखील ईडीने केला आहे. या अटकेनंतर ईडीने समूहातील इतर सदस्यांचीही चौकशी सुरू केली आहे. रिलायन्स समूहासंबंधी ही घटना सध्या आर्थिक आणि व्यापारी क्षेत्रात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.