Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मृत्यूच्या ५ दिवसानंतरही IPS पूरन कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार नाहीत; शवविच्छेदनावरून वाद

मृत्यूच्या ५ दिवसानंतरही IPS पूरन कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार नाहीत; शवविच्छेदनावरून वाद

चंदीगड : खरा पंचनामा

हरियाणातील आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांच्या आत्महत्येला पाच दिवस झालेत. अद्याप त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. वाय पूरन कुमार यांच्या कुटुंबियांनी शवविच्छेदनासाठी परवानगी दिलेली नाही.

मंगळवारी आयपीएस वाय पूरन कुमार यांनी गोळी झाडून घेत स्वतःला संपवलं होतं. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी डीजीपी सागर प्रीत हुड्डा आणि आयजी पुष्पेंद्र कुमार पोहोचले होते. कुटुंबाच्या परवानगीनंतरच शवविच्छेदन होईल. शवविच्छेदनाच्या आधी पार्थिव कुटुंबियांना दाखवण्यात येईल.

वाय पूरन कुमार यांच्या आयएएस पत्नीने पोलिसांना पत्र लिहून एफआयआरमध्ये अर्धवट माहिती नोंदवल्याचा मुद्दा उपस्थित केला. एफआयआरमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे लिहिलेली नाहीत. या प्रकरणी हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत सिंह आणि रोहतकचे एसपी नरेंद्र बिजारिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पूरन कुमार यांचे मेहुणे आणि आम आदमी पार्टीचे आमदार अमित रतन यांनी म्हटलं की, कुटुंबियांची परवानगी नसतानाही पूरन कुमार यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केलं जात आहे. प्रशासनाने न विचारता पार्थिव हलवलं. आमची फसवणूक केली जात आहे. पाच दिवस होऊनही न्याय मिळत नाहीय.

वाय पूरन कुमार यांच्या शवविच्छेदनासाठी डॉक्टरांचं एक पॅनल तयार केलं जाईल. काँग्रेस नेते हरिश रावत यांनी पूरन कुमार यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलंय. एका प्रामाणिक आणि कष्टाळू पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू धक्कादायक आहे. या प्रकरणी चंडिगढ पोलिसांनी ६ सदस्यीय स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम स्थापन करण्याची घोषणा केलीय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.