निवडणुकीच्या तोंडावर ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारमधील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सरकारने एकूण ७ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. मंत्रालय तसेच पुणे महानगरपालिका आणि इतर विभागांमध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील एकूण सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या नवीन विभागात नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत.
संजय खंडारे (IAS: 1996) विद्यमान प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांची बदली करून त्यांची नियुक्ती प्रधान सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.
पराग जैन नैनुतिया (IAS: 1996) विद्यमान प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग - यांची बदली करून नियुक्ती प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.
कुनाल कुमार (IAS: 1999) यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई म्हणून करण्यात आली आहे.
वीरेंद्र सिंग (IAS: 2006) - विद्यमान सचिव (२), सार्वजनिक आरोग्य विभाग - यांची बदली करून नियुक्ती सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.
ई. रविंद्रन (IAS: 2008) - विद्यमान मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई यांची बदली करून नियुक्ती सचिव (२), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.
एम. जे. प्रदीप चंद्रन (IAS: 2012) विद्यमान अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका यांची बदली करून नियुक्ती प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प, पुणे येथे करण्यात आली आहे.
पवनीत कौर (IAS: 2014) विद्यमान उपमहासंचालक, यशदा, पुणे - यांची बदली करून नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे येथे करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.