Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खोटी गुंतवणूक दाखवणं 1050 पोलिसांना भोवलंआयकर विभागाच्या नोटिसांनंतर खळबळ

खोटी गुंतवणूक दाखवणं 1050 पोलिसांना भोवलं
आयकर विभागाच्या नोटिसांनंतर खळबळ

बुलढाणा : खरा पंचनामा

आयकर विभागाने एकाच वेळी, बुलढाणा जिल्हा पोलिस दलातील तब्बल 1050 पोलिस कर्मचाऱ्यांना आयकर वाचवण्यासाठी खोट्या गुंतवणूक केल्याच्या संशयावरून नोटिसा बजावल्याने खळबळ उडाली आहे.

एकाच वेळी एवढ्या मोठ्याप्रमाणात पोलिस कर्मचाऱ्यांना आयकर विभागाच्या नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने महाराष्ट्रात बुलढाणा पोलिस दल चर्चेत आलं आहे. आयकर विभागाच्या या अॅक्शननंतर बुलढाणा पोलिस दलाचे प्रमुख नीलेश तांबे देखील पोलिस कर्मचाऱ्यांच्या या प्रतापावर नाराज झाले असून, कठोर भूमिका घेणार असल्याचा इशारा देणारा संदेश बिनतारी संदेश विभागातून पाठवला आहे.

बुलढाणा जिल्हा पोलिस दलात आयकर विभागाच्या नोटिसांमुळे खळबळ उडाली आहे. तब्बल 1050 पोलिस अंमलदारांना तीन ते चार वर्षांत आयकर रिटर्न्समध्ये बोगस कपाती दाखवून कर चोरी करण्याच्या संशयावरून नोटीस बोगस कपाती दाखवून कर चोरी करण्याच्या संशयावरून नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत आयकर विभागाने पोलिस अधीक्षक कार्यालयाला देखील नोटीस बजावली आहे. यामुळे बुलढाणा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

हा प्रकार चार्टर्ड अकाउंटेंटच्या संगनमताने करण्यात आल्याचं समोर येत आहे. पोलिस (Police) कर्मचाऱ्यांनी ही कर चुकवेगिरी चार्टर्ड अकाउंटेंटशी संगनमत करत केल्याचे आयकर विभागाच्या पडताळणीत देखील समोर आलं आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी कलम 80c आणि गृह कर्जावरील व्याज सवलतीच्या अंतर्गत बनावट गुंतवणुकी दाखवत कर कपात मिळवल्याचं समोर आलं आहे.

प्रत्यक्षात विमा, पीपीएफ, म्युच्युअल फंड किंवा गृह कर्ज नसतानाही मोठ्या रकमेच्या कपाती दाखवल्या गेल्या आहेत. हे सर्व रिटर्न एकाच चार्टर्ड अकाउंटेंटच्या माध्यमातून दाखल करण्यात आल्याचा समोर आलं आहे. आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या रिटर्नची पडताळणी केल्यावर हा सर्व बोगस प्रकार उघडकीस आला. आयकर विभागाने पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर पोलिस अधीक्षक कार्यालयाला देखील नोटीस बजावली आहे.

एकाच वेळी एवढ्या मोठ्याप्रमाणात पोलिस कर्मचाऱ्यांना आयकर विभागची नोटीस आल्याने बुलढाणा पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी कठोर भूमिका घेत, पोलिस अंमलदारांना आपले इन्कम टॅक्स रिटर्न्स तपासून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यात चूक आढळल्यास तात्काळ सुधारित विवरणपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.