Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

20 बलात्कार, 18 हत्या करणाऱ्या आरोपीला तुरुंगात 5 स्टार ट्रीटमेंट!

20 बलात्कार, 18 हत्या करणाऱ्या आरोपीला तुरुंगात 5 स्टार ट्रीटमेंट!

बंगळूरू : खरा पंचनामा

आज देशाच्या प्रत्येक कोपऱ्या महिला अत्याचाराच्या बळी ठरत आहेत... त्यामुळे देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक चर्चेत आलाय. एखाद्या महिलेवर बलात्कार झाल्यानंतर असंख्या लोकं रस्त्यावर उतरतात आणि आरोपीला कठोर शिक्षा द्या... अशी मागणी करतात.

पण नराधमाला शिक्षा होते का आणि झाली तरी तुरुंगात तो नराधम कसं आयुष्य जगत आहे... हे पोलीस प्रशासनाशिवाय कोणाला माहिती नसतं. पण एक हदरवणारं वास्तव समोर येत आहे.

तब्बल 20 महिलांवर बलात्कार आणि 18 महिलांची हत्या करणाऱ्या आरोपीली तुरुंगात रॉयल ट्रीटमेंट मिळत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिरीयल रेपिस्ट आणि किलर उमेश रेड्डी तुरुंगात दोन अँड्रॉइड आणि एक कीपॅड मोबाईल फोन वापरताना दिसला. बंगळुरूमधील परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातील हे सत्य आहे. आरोपी फोन वापरत आहे... हे सत्य पोलिसांना माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1996 ते 2002 दरम्यान 20 महिलांवर बलात्कार आणि 18 जणांची हत्या केल्याबद्दल उमेश रेड्डी याला दोषी ठरवण्यात आलं होतं. सुरुवातीला त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा 30 वर्षांच्या तुरुंगवासात बदलली. रेड्डी याने मानसिक आजार असल्याचा दावा केला होता, परंतु वैद्यकीय अहवालात तो मानसिकदृष्ट्या निरोगी असल्याचे आढळून आलं.

एवढंच नाही तर, अन्य एका व्हिडीओमध्ये राजू नावाचा आरोपी, तुरुंगात फोन वापरताना जेवण बनवताना दिसला.. राण्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात तरुण राजूला अटक करण्यात आली होती. तो दुबईतून सोन्याच्या तस्करीचं नेटवर्क चालवत होता, ज्यामध्ये राण्या रावचाही सहभाग होता.

तरुण राजूला जिनेव्हाला पळून जाण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आलं. व्हिडिओनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, सरकार या प्रकरणाची चौकशी करेल आणि तुरुंग अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करेल. आता याप्रकरणी सरकार काय निर्णय घेणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आरोपींना तुरुंगात घरासारखं वातावरण मिळत असेल तर, गुन्हे थांबणार नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्याला देखील तुरुंगात 5 स्टार ट्रीटमेंट मिळत असेल तर, महिलांवर होणारे अत्याचार थांबतील का? हा एक मोठा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे .

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.