जयसिंगपूरमधील प्रभाग 11 मधून सामाजिक कार्यकर्ते रंगराव पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
जयसिंगपूर : खरा पंचनामा
जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुका सुरु झाल्या आहेत. या निवडणुकीत शाहूनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते रंगराव हिंदुराव पवार यांनी प्रभाग क्र. 11 ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपचे माधवराव घाटगे यांनी संयुक्तपणे केलेल्या शिरोळ तालुका विकास आघाडीमार्फत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शनिवारी रंगराव पवार यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रभागातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील मतदार, नागरिक, महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
जयसिंगपूरचे माजी नगरसेवक सर्जेराव पवार यांचे ते बंधू आहेत. त्यांचा समाज कार्याचा वारसा गेल्या कित्येक वर्षांपासून रंगराव पवार सांभाळत आहेत. कोणतेही पद नसताना रंगराव पवार यांनी शाहूनगर भागात केलेल्या सामाजिक कार्यामुळे नागरिकांच्या आग्रहास्तव पवार यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोपट सूर्यवंशी, अमर माने, आण्णासो चव्हाण, अशोक पाटील, धनाजी पवार, संजय कांबळे, अजित माने, ॲड. भास्कर माने, राहुल काळे, विनय पाटील, सुदर्शन घोरपडे, राजेंद्र सुतार, स्वप्नील आवटी, बळवंत पाटील, अनिल ताडे, प्रकाश सुतार, ओंकार बेंद्रे, नितीन जगदाळे, गणेश घोरपडे, राजू लोकरे, संदीप चौगुले, सचिन मिरजे, विनोद फल्ले, विजय पाटील, राहुल माळी, योगेश दळवी, सुहास जाधव, पवन हिरेमठ, निलेश बोटांगळे, प्रदीप भाटे यांच्यासह प्रभागातील नागरिक, महिला उपस्थित होत्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.