साखरपुड्यादिवशीच एकतर्फी प्रेमातून तरुणाचा मुलीसह तिच्या वडिलांवर खुरप्याने खुनी हल्ला
मिरज तालुक्यातील टाकळी येथील घटना : लग्नाला नकार दिल्याने कृत्य
मिरज : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील टाकळी येथे एकतर्फी प्रेमातून तसेच लग्नाला नकार दिल्याच्या रागातून तरुणाने तरुणीच्या साखरपुड्यादिवशीच तरुणीसह तिच्या वडिलांवर विळ्याने खुनी हल्ला केला. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. आजच सायंकाळी मुलीचा साखरपुडा होणार होता. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी दिली. दरम्यान संशयित पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे मिरज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी जखमी मुलीने फिर्याद दिली असून त्याप्रमाणे अक्षय सुभाष पाटील (वय 26, रा. टाकळी ता. मिरज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी 23 वर्षांची असून ती नोकरीं करते. एकतर्फी प्रेमातून संशयित तरुणीला वारंवार वेगवेगळ्या नंबरवरुन फोन करुन लग्न कर नाहीतर तुला व तुझ्या पप्पांना संपवुन टाकेन अशी धमकी दिली होती. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपी यास त्याचेशी लग्न करण्यास नकार दिला होता.
रविवारी सायंकाळी जखमी मुलीचा साखरपुडा होता. याची माहिती अक्षय याला मिळाली. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास तो मुलीच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने पिशवीतुन विळा काढुन तरुणीच्या वडीलांवर विळ्याने खुनी हल्ला केला. त्यामध्ये तिच्या वडीलांच्या डोक्यात व मानेवर गंभीर दुखापत झाली. तरुणी वडीलांना वाचविण्यासाठी गेल्यावर त्याने तिच्यावर विळ्याने वार केला. त्यात तिच्या डाव्या हाताची करंगळी तुटली आहे. हल्ला झाल्यावर संशयित अक्षय तेथून पळून गेला.
गंभीर जखमी झालेले अभयकुमार व त्यांच्या मुलीस तत्काळ मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजीत सीद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.