Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत हिट अँड रन प्रकरण : कार चालकावर गुन्हा दाखल11 जण जखमी, दोघे गंभीर

सांगलीत हिट अँड रन प्रकरण : कार चालकावर गुन्हा दाखल
11 जण जखमी, दोघे गंभीर

सांगली : खरा पंचनामा

सांगली शहरातील बालाजी मिल रोड परिसरात असणाऱ्या आण्णा भाऊ साठे कमान ते कल्पतरु मंगल कार्यालय रस्त्यावर रविवारी रात्री हिट अँड रनचा थरार घडला. यातील कार चालकविरुद्ध हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.

संतोष मदन गोपाल झंवर (वय 52, रा. दक्षिण शिवाजीनगर सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अवधुत तुकाराम सुतार (वय 39, रा. 1044 अ एस.टी. स्टॅण्ड रोड, गांवभाग सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मद्यधुंद अवस्थेत चालक संतोष झंवर याने त्याच्या मालकीची स्कोडा गाडी चालवत रस्त्यावर जाणाऱ्या सहा वाहनांना धडक दिली. या धडकेत सहाही वाहनाचे  मोठे नुकसान झाले. तसेच या अपघातात एकुण 11 जण जखमी झाले आहेत,  जखमीमध्ये  अविनाश बाळासाहेब माने (वय 45),  आयुष अविनाश माने (वय 9), अन्वी अविनाश माने,  आरती अविनाश माने (सर्व रा. संजयनगर, सांगली), पाडाण्णा हणमंत मद्रासी,  अनिता चंदू पोकरे (वय 40, रा. कर्नाळ रोड,सांगली),  निलेश जितलाल मिस्त्री (वय 42),  रेणुका निलेश मिस्त्री (वय 39, दोन्ही रा. अहिल्यानगर, सांगली),  स्वाती विश्वकर्मा (रा. अहिल्यानगर), सिध्दी राजेश पिराळे (वय 12),  राजेश सुभाष पिराळे (दोन्ही रा. गणेशनगर, सांगली) यांचा समावेश आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,  कार चालकाने  दारू च्या नशेत वेगात आल्याने त्याचे गाडीवरील नियंंत्रण सुटल्याने आधी एका दुचाकीला त्याने धडक दिली, त्यानंतर आणखी दोन दुचाकी  गाड्यांना शेवटी एका चार चाकी वाहनाला धडक देत ते वाहन पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन धडकून थांबले. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की स्कोडा  गाडीचे एअर बॅग ओपन झाले त्यामुळे झंवर वाचले. पण गाडीचे मोठे  नुकसान झाले, तर इतर  वाहनांचे ही मोठे नुकसान झाले.  धडक देणाऱ्या कार चालकाला जमावाने मारहाण केली. तसेच गाडीची ही  मोठया प्रमाणात तोडफोड केली आहे. या प्रकरणाचा तपास  विश्रामबाग  पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कांचन हे करत आहेत. पुढील तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.