Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डॉ. गौरी गर्जे-पालवे यांच्या कुटुंबाची रूपाली चाकणकरांनी घेतली भेट : संपूर्ण तपास निःस्पक्ष होईल !

डॉ. गौरी गर्जे-पालवे यांच्या कुटुंबाची रूपाली चाकणकरांनी घेतली भेट : संपूर्ण तपास निःस्पक्ष होईल ! 

माधवी गिरी गोसावी
शिरूर : खरा पंचनामा

राज्यांच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरळी परिसरांत समोर आली आहे. डॉक्टर गौरी गर्जे-पालवे (पत्नी) यांनी जीवन संपवल्याचे प्राथमिक निष्कर्ष असून, या घटनेमुळे परिसरांत शोककळा पसरली आहे.

अनंत गर्जे आणि गौरी यांचा या वर्षी 7 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. मात्र अवघ्या दहा महिन्यांत संसारात तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत असून.अनंत गर्जे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोपही पुढे आला आहे.

दरम्यान, गौरीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर देखील अँक्शन मोडवर  आल्या असून त्यांनीही डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या कुटुंबाची शिरूर कासार येथे जावुन भेट घेतली आहे. आम्ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत संपूर्ण तपास होईल, तपासामध्ये कोणतेही राजकारण होणार नाही. वरळी पोलिसांशी भेट घेवुन मी चर्चा केली आहे. पोलिसांनी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वरळी पोलिसांनी गौरी गर्जे-पालवे आत्महत्येप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे-आंधळे व दीर अजय गर्जे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाला राजकीय वळण देणार नाही, अशी भूमिका रूपाली चाकणकरांनी  स्पष्ट केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.