Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना दारू पिणाऱ्यांवर कारवाई हॉटेल सन शाईनच्या मॅनेजरसह 15 तळीरामांचा समावेश : विश्रामबाग पोलीस, राज्य उत्पादन शुल्कची संयुक्त कारवाई

सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना दारू पिणाऱ्यांवर कारवाई 
हॉटेल सन शाईनच्या मॅनेजरसह 15 तळीरामांचा समावेश : विश्रामबाग पोलीस, राज्य उत्पादन शुल्कची संयुक्त कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

बिअर बारचा परवाना नसतानाही हॉटेलमध्ये दारू पिण्यास परवानगी दिल्याप्रकरणी धामणी रोडवरील हॉटेल सन शाईनच्या मॅनेजरसह 15 तळीरामांवर कारवाई करण्यात आली. विश्रामबाग पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्कच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.

साजीब सत्यम बिसवास (रा. इनामधामणी सांगली, हॉटेल मॅनेजर), सुनिल बाळासो देसाई (रा. आरग ता. मिरज जि. सांगली), दिनेश संभाजी निकम (सलगरे ता. मिरज जि. सांगली), क्रांतीकुमार आनंदराव तांबे (रा. स्टेशन रोड, मिरज ता. मिरज जि. सांगली), शुभम श्रीधर वगरे (रा. १०० फुटी रोड, सांगली), अनिकेत अशोक जाधव (रा. नवि मुंबई), राहुल महादेव निकम (रा. ५० फुटी रोड सांगली), प्रदिप मारुती कदम (रा. विठ्ठल नगर, पुणे), स्वप्नील विनय व्यास (रा. इस्लामपुर, ता. वाळवा), पवन पाडुरंग आरबूणे (रा. विश्रामबाग सांगली), सौरभ संजय गवळी (रा. शनिवार पेठ सांगली), अनिल मोहन भट्टी (रा. आमराई जवळ, सांगली), परेश मोहन भट्टी (रा. आमराई जवळ, सांगली), हर्षद मोहनलाल भट्टी (रा. आमराई जवळ सांगली), राकेश सुनिल ऐनापुरे (रा. चांदणी चौक सांगली), रेहान रफिक महावत (रा. इचलकरंजी जि. कोल्हापुर) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. येथून पुढेही जिल्ह्यात अशा संयुक्त कारवाया सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, राज्य उत्पादन शुल्कचे मिरजचे निरीक्षक दीपक सुपे, पोलीस उपनिरीक्षक सतेज कार्वेकर, दुय्यम निरीक्षक अजय लोंढे, दुय्यम निरीक्षक लक्ष्मण पवार, अमर मोहिते, संदिप साळुंखे, नंदकुमार मदने, शुभांगी मुळीक, विष्णु गावडे, जावेद अत्तार, प्रशांत माळी, सुनिल शिंदे, सचिन गोदे, भगवान शिंदे, सुहेल कार्तीयानी, स्वप्निल आटपाडकर, विनायक खांडेकर, शाहीन शेख, कविता सुपने, स्वप्निल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.