मूकबधिर मुलीवर अत्याचार करणा-या नराधमास २० वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा
सांगली : खरा पंचनामा
घरात कोणीही नसल्याचे पाहून मूकबधिर मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा सुनावली तसेच पिडीतेवर झाले अत्याचारापोटी तिला भरीव नुकसानभरपाई शासनाकडुन मिळणेबाबत आवश्यक ते निर्देश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ४
जे. ए. मोहंती यांनी दिले.
सिध्दाप्पा लक्ष्मण माळी (वय ६४, रा. व्हसपेठ, ता. जत, जि. सांगली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने गावातील अज्ञान मुकबधिर असलेल्या मुलीची शारीरीक कमतरतेचा गैरफायदा घेऊन, घरी कोणी नसलेचे पाहुन पिडीत मुकबधिर मुलीवर बलात्कार केला. त्यावेळेस मुकबधिर मुलीची आई घटनास्थळी आली व आरोपीस सदरचे कृत्य करीत असताना पाहीले. त्यानंतर लगेच आईने आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळुन गेला.
त्यानंतर पिडीत मुलीने संपुर्ण हकीकत तिच्या आईस सांगितली. त्यानंतर आईने जत पोलीस ठाण्यात धाव घेतली व फिर्याद नोंदवली. पोलीसांनी तातडीने दखल घेऊन पुढील तपास केला व आरोपीविरुध्द सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
या खटल्यात एकुण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीतेची व पिडीतेच्या आईची साक्ष बहुमुल्य ठरली. सर्व साक्षीपुराव्यांचा विचार करुन न्या. जे. ए. मोहंती यांनी आरोपीस २० वर्षांची सक्त कारावासाची तसेच दंडाची शिक्षा सुनावली. याकामी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील व्ही. के. मुरचिटे यांनी काम पाहिले. या खटल्यात जत पोलीस ठाणे येथील तुकाराम बंडगर तसेच पैरवी कक्षातील रेखा खोत, सुनिता आवळे व वंदना मिसाळ यांचे सहकार्य लाभले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.