वाहनांची फिटनेस टेस्ट फी 2,500 वरून थेट 25,000 रुपये
नितीन गडकरींचा धक्कादायक निर्णय
दिल्ली : खरा पंचनामा
देशभरातील वाहनधारकांना मोठा धक्का बसला आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने (MORTH) वाहनांच्या फिटनेस टेस्टच्या शुल्कात मोठा बदल केला असून काही वाहनांसाठी ही फी पूर्वीच्या तुलनेत तब्बल 10 पट वाढली आहे. हा बदल सेंट्रल मोटर व्हेइकल रुल्सच्या फिफ्थ अमेंडमेंट अंतर्गत करण्यात आला असून तो तात्काळ लागूही झाला आहे.
पूर्वी 15 वर्षांपेक्षा जुनी गाडी असेल तरच फिटनेस टेस्टसाठी जास्त फी आकारली जात होती. मात्र नवे नियम लागू झाल्यानंतर गाडी 10 वर्षांची झाली की वाढीव फी लागू होईल. नवीन व्यवस्थेनुसार गाड्यांना तीन गटांमध्ये विभागण्यात आले आहे:
1. 10 ते 15 वर्ष
2. 15 ते 20 वर्ष
3. 20 वर्षांपेक्षा जास्त
गाडीचे वय वाढेल तसा फिटनेस टेस्टचा खर्चही वाढत जाईल. दोन चाकीपासून ट्रकपर्यंत सर्व वाहनांसाठी दर वाढले आहेत. हे नवे शुल्क दोन चाकी, तीन चाकी, LMV, मीडियम आणि हेवी व्यावसायिक वाहनांसह सर्व वाहनांवर लागू आहेत. याचा सर्वाधिक फटका कमर्शियल वाहने वापरणाऱ्यांना बसणार आहे.
सर्वात मोठा धक्का व्यावसायिक वाहनांना बसणार आहे.
20 वर्ष जुने ट्रक/बस : 2,500 - 25,000 रुपये
20 वर्ष जुने मीडियम कमर्शियल वाहन : 1,800 -20,000 रुपये
20 वर्ष जुने LMV : 15,000 रुपये
20 वर्ष जुनी ऑटोरिक्षा : 7,000 रुपये
20 वर्ष जुनी मोटरसायकल : 600 - 2,000 रुपये
15 वर्षांखालील गाड्यांचीही फी वाढली
मोटरसायकल: 400 रुपये
लाइट मोटर वाहन (LMV): 600 रुपये
मीडियम/हेवी कमर्शियल वाहन: 1,000 रुपये
सरकारचा दावा आहे की, जुनी, प्रदूषणकारक वाहने रस्त्यावरून कमी व्हावीत, वाहनांची नियमित तपासणी व्हावी, रस्ते अपघात कमी व्हावेत. यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. मात्र, वाहनधारकांच्या मते ही वाढ मोठे आर्थिक नुकसान करणारी आहे. विशेषतः ज्यांच्याकडे 10 वर्षांची जुनी गाडी आहे त्यांना आता फिटनेस टेस्टसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.