252 कोटी ड्रग्स प्रकरणी श्रद्धा कपूरच्या भावाला समन्स
ऑरीदेखील अडचणीत, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील २५२ कोटी रुपयांच्या ड्रग्स प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाकडून तपास केला जात आहे. आता अमली पदार्थ विरोधी पथकाने बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला समन्स बजावले आहे.
तसेच, सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा ओरहान अवत्रामणी उर्फ ऑरी यालाही दुसरे समन्स बजावले आहे. येत्या मंगळवारी २५ नोव्हेंबरला सिद्धांत कपूरला त्याचा जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले आहेत. तर २६ नोव्हेंबरला ऑरीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने घाटकोपर युनिटने या दोघांना चौकशीसाठी बोलावले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.