Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कवठेपिरानचे आदर्श सरपंच भीमराव माने यांना 41 लाखांचा ऑनलाईन गंडाबोगस आरटीओ ई-चलन पाठवून फसवणूक

कवठेपिरानचे आदर्श सरपंच भीमराव माने यांना 41 लाखांचा ऑनलाईन गंडा
बोगस आरटीओ ई-चलन पाठवून फसवणूक

सांगली : खरा पंचनामा

सांगलीतील मिरज तालुक्यातील कवठेपिरानचे आदर्श सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांना अज्ञाताने तब्बल 41 लाख रुपयांना ऑनलाईन गंडा घातला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

भीमराव माने यांना बँकेत रजीस्टर असणार्‍या मोबाईल क्रमांकावर बोगस आरटीओ ई-चलनचा मेसेज पाठविण्यात आला. त्यांनी तो ओपन केला. ओपन करताच ती लिंक बंद झाली. त्यानंतर अज्ञाताने त्यांचा मोबाईल पूर्णपणे हॅक करून 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 27 वेळा आर्थिक व्यवहार केले. यावेळी त्यांच्या बँक खात्यातून 41 लाख रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच भीमराव माने यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

त्यांना महाराष्ट्र शासनाने आदर्श सरपंच म्हणून  पुरस्कारही दिला होता. माने यांच्यासारख्या मातब्बर राजकीय व्यक्तीला लाखो रुपयांना गंडा घातल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.