जत तालुक्यातील अवैध ताडी विक्री विरोधात मोहीम : 20 जणांना अटक, 19 गुन्हे दाखल
राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या पथकांची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई
सांगली : खरा पंचनामा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या तब्बल सात पथकांनी जत तालुक्यातील 13 गावातील ताडी विक्री केंद्रे, हातभट्टी अड्डे, अवैध दारू विक्रेत्यांवर छापे टाकण्यात आले. याप्रकरणी 20 जणांना अटक करून 19 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सीमेवर असणाऱ्या जत तालुक्यातील गावात अवैध ताडी, देशी दारू, हातभट्टी, विदेशी दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी चिंचाळकर यांनी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 7 पथके तयार केली होती. शनिवारी सकाळी सहा वाजता या पथकांनी जत तालुक्यातील पाच्छापूर, मुचंडी, दरीबडची, संख, बिरुळ, बसर्गी, सिंदूर, उमराणी, तिकोंडी, शेगांव, वालेखिंडी, देनुर, तिप्पेहळी या गावांत एकाचवेळी छापे टाकण्यात आले. यामध्ये एकुण १६२५ ब. लि. ताडी, २९ ब. लि. देशी दारू, २.३४ ब. लि. विदेशी दारू असा ८६ हजार ३१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत विभागीय भरारी पथक कोल्हापूर, भरारी पथक कोल्हापूर १, सांगली भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क, जत, राज्य उत्पादन शुल्क ,विटा, राज्य उत्पादन शुल्क, मिरज, राज्य उत्पादन शुल्क, इस्लामपूर या पथकांनी भाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.