Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवलाराज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय

5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय

मुंबई : खरा पंचनामा

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्यानुसार, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. त्यामध्ये, 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सहकारी, विधि व न्याय, वित्त विभाग आणि जलसंपदा विभागासाठी 2 असे एकूण 5 निर्णय घेण्यात आले.

मंत्रालयातील आजच्या बैठकीतील मंत्रिमंडळ निर्णय : 
(सहकार विभाग)
नाशिक, नागपूर व धाराशिव या जिल्हा मध्यवती सहकारी बँकांना ८२७ कोटी रुपयांचे शासकीय भाग भांडवल
(विधि व न्याय विभाग)
न्यायालयीनसंकुले तसेच न्यायाधिशांचीनिवासस्थाने यांच्या सुरक्षेत वाढ. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त सुरक्षारक्षक उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता खर्च तरतुदीस मान्यता
(वित्त विभाग)
पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्यास मान्यता. अंमलबजावणीचा कालावधी १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत राहणार
(जलसंपदा विभाग)
हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस साठवण तलाव प्रकल्पासाठी ९० कोटी ६१ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता
(जलसंपदा विभाग)
हिंगोली जिल्ह्यातील सुकळी साठवण तलाव (ता. सेनगाव) प्रकल्पासाठी १२४ कोटी ३६ लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढानागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगांच्याविकासासंदर्भात सादरीकरण बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस म्हणाले की, राज्यातील भाविक नियमितपणे ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी येतात, हे लक्षात घेऊन श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढानागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांचासर्वसमावेशक विकास आराखडा असावा. मंदिर परिसरात सुरू असलेली विकासकामे गतीने पूर्ण करून प्रस्तावित कामांचे योग्य नियोजन करा. या परिसरात भाविकांच्यासुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिकसुरक्षाप्रणाली कार्यरत करून भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा सुविधा तयार करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.